मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, रविवारी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. गेल्या काही दिवसांत करोना रुग्ण वाढले. करोनासोबत जगायला शिका, हे मी सांगत आहे. मार्च-एप्रिलपासून करोना संकट राज्यावर आलं. आता अचानक रुग्णांची संख्याही वाढली. हा विषाणू गुणाकार करत जातो. त्याला मर्यादा नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख करोना रुग्ण असतील, असं ते म्हणाले. सध्या सात हजार, तर मे अखेरपर्यंत १३ ते १४ हजार बेड्स उपलब्ध असतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे. पुढील आठ ते दहा दिवस पुरेल असा रक्तसाठा आहे. पुढील काळात रक्ताची आवश्यकता भासेल. इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.